तर आम्हालाही बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्याची परवानगी द्या-संजय राऊत

0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सुरु असलेले वाक््युद्ध सुरुच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काही गावांवर हक्क सांगायला सुरुवात केल्यावर तेथे कर्नाटक भवन उभारण्याचे बोलून दाखवले आहे. ( SOLAPUR ) सोलापुरात किंवा कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असे खासदार संजय राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. मुंबईमध्ये अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. (SANJAY RAUT)

पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवर हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बेंगळुरुला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून त्या संदर्भात निर्णय व्हावा. मग आम्ही तुमचा विचार करू, असेही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार म्हणून शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू, आम्ही त्यांना संधी देतोय, छत्रपती शिवरायांचा अपमान तुम्ही सहन करताय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करताय, द्या ना त्यांना शिव्या, तुम्हाला जर इतक्या उत्तम शिव्या देता येत असतील, त्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमच्या शिव्यांचे कौतुक करेल, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा