शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी काय करता येईल, याचा विचार करावा- नाना पाटेकर

0

नागपूर : ज्या दिवशी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या बंद होतील, त्या दिवशी महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल, असे सांगताना शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता येईल, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी (Veteran Actor Nana Patekar on Farmers Suicide) व्यक्त केले. नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनसमारंभाचे पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य पाहुणे उपस्थित होते. सरकार आपल्या परीने जे करायचे ते करत राहील, मात्र, आपल्याला काय करता येईल हे प्रत्येकाने बघायला हवे. ऋतुचक्र खूप बदललेले आहे. शेतकऱ्यांनी नेमके कशाच्या आधारावर जगायचे आहे हे कळत नाही, असेही ते म्हणाले.
नाना पाटेकर आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्याकडे मार्केटचे तज्ज्ञ हवेत. कारण शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतल्यावर त्याला फायदा होईल, हे कळायला हवे. ज्या दिवशी राज्यातील शेतकरी आत्महत्या करण बंद करेल, तेव्हाच महाराष्ट्र हे एक नंबरचे राज्य होईल. आता पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस संपलेले आहेत. हे लक्षात आल्यावर आता शेतकऱ्यांनी शेती कसण्याची पद्धत बदलली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.


शहरात जाऊ नका


शेतकऱ्यांच्या मुलांनी गावातून स्थलांतर करुन शहारात जाऊ नये. जिथे आहे तिथे आपली जमीन न विकता राबायला हवे. स्थलांतर पूर्णपणे बंद होणे गरजेचे आहे. आता लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आपण का बोलत नाही? ही सगळ्यात मोठी समस्या असल्याचे पाटेकर म्हणाले. मी शहरात राहणे बंद केले असून मला शहरात श्वास घेता येत नाही, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा