नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप; अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळले

0

नागपूर : नियमानुसारच गायरान जमिनीचे वाटप केल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. गायरान जमीन प्रकरणावरून विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले होते. गायरान जमीन अवैधरीत्या वाटप केल्याचा आरोप सत्तारांवर केला होता. या आरोपाला सत्तार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. या प्रकरणावर सत्तार यांनी निवेदन दिले. दरम्यान, यावेळी विरोधकांनी सभात्याग केल्याचे पाहायला मिळाले.

अब्दुल सत्तारांनी स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करून वाशिम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्यावरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले.

तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी केली. या विरोधकांच्या आरोपाला सत्तारांनी आज विधानसभेत उत्तर दिले. नियमानुसारच जमिनीचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल असेही सत्तार यावेळी म्हणाले.