Amravati Fire News : सेंट्रल बँकेला भीषण आग

0
Amravati Fire News : सेंट्रल बँकेला भीषण आग
amravati-fire-news-massive-fire-at-central-bank

बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक

अमरावती (Amaravati) :- अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात असलेल्या सेंट्रल बँकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाले असल्याची ही माहिती पुढे आली आहे. बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडलेत. त्यामुळे सुदैवाने यात कुठली जीवित हानी झाली नाही. मात्र या घटणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक
पुढे आलेल्या माहितीनुसार, अचानक लागलेल्या या आगीची घटनेने बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झालंय. तर घटनेची माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र आग विझत नसल्याने धामणगाव आणि तीवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले. बँकेला अचानक आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय.

आगीत 14 ते 15 चारचाकी वाहन जळून खाक
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अब्दुलटोला येथील एका घराला रात्रीच्या सुमारस आग लागल्याने विक्रीकरिता ठेवलेली 14 ते 15 चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच मोहफुल वेचण्यासाठी शेतकरी मोहफुलाच्या झाडाखाली आग लावून कचरा जाळत असतात. यामुळे वणवा लागून जंगलात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतात.

Amravati fire today live
Amravati fire today
Amravati is in which state
Amravati temple
Amravati Map
Amravati tourist places
Mumbai amravati express accident
Amravati distancewww.amravati.gov.in 2025
Amravati zone list