

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलावाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी गेलेल्या ५ तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावाच्या परिसरात आज दुपारी ही घटना घडली. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे या पाच तरुणांचा मृतामध्ये समावेश आहे. हे सर्व युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी येथील रहिवासी होते.
आज दुपारच्या सुमारास हे पाचही तरुण आपल्या काही मित्रांसह घोडाझरी तलावाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते. काही वेळानंतर या तरुणांनी आंघोळीसाठी तलावात उतरले. पण पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाचही तरुण बुडाले. या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजच्या घोडाझरी तलावात झालेली दुर्घटना वेदनादायक आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे ही घटना घडली. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. प्रशासनाने अशा ठिकाणी माहिती फलक लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पण माहिती नसलेल्या ठिकाणी युवकांनी सुद्धा अतिउत्साहात आततायीपणा करुन जीव धोक्यात घालू नये .
अशी प्रतिक्रिया संजय गजपुरे , नागभीडमाजी जि.प.सदस्य , चंद्रपुर यांनी दिली.