23MREG62 मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत महिला संघटना आक्रमक
अमरावती, 23 जुलै मणीपुर येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. मागील दोन ते अडीच महिन्यापासून भारताच्या उत्तर पूर्व भागातील मणिपूर राज्यात सतत हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारामध्ये काही दिवसापूर्वी दोन-तीन महिलांना विवस्त्र करीत रस्त्यावरून फिरवीन्यात आले. त्यानंतर त्यांचेवर हिंस्त्र झालेल्या अनियंत्रित जमावातील पुरुषांनी लेंगिक शोषण केले. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमामध्ये झाली होती. सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद असून मानवतेला काळीमा फासणारा आहे. त्याबरोबरच समस्त महिला अपमान आहे. या निंदनीय प्रकाराकडे केंद्र सरकार व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच दोषी व्यक्तींना कठोर शासन मिळण्याकरिता व अश्या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या करिता लक्ष प्रतिष्ठान व जिजाऊ ब्रिगेड, अमरावतीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. स्थानिक इरविन चौकात मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ सर्व महिलांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला. यावेळी लक्ष प्रतिष्ठानच्या व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व समविचारी संघटनांच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी लक्ष प्रतिष्ठान, अस्तित्व बहुउद्देशीय संस्था, वैभव लक्ष्मी बहुउद्देशीय संस्था, चैतन्य कॉलनी, संघर्ष वेल्फेअर शिक्षण संस्था, आराध्या बहुउद्देशीय संस्था, रमाई ब्रिगेड स्वयं सिद्ध महिला समूह, लक्षवेध सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मनुष्री बहुउद्देशीय संस्था, स्त्री शक्ती संघटना, यशवंती बहुउद्देशीय महिला मंडळ, इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.