भीषण अपघातात 4 ठार, 6 जखमी

0

यवतमाळ – अमरावती मार्गावर कारला एसटीची जोरदार धडक


नेर. नांदगाव खंडेश्वर(Nandgaon Khandeshwar) येथील लग्नाचा स्वागत समारोह आटोपून कारने यवतमाळकडे (Yavatmal) निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. नेर शहरालगत असलेल्या लोणीजवळ भरधाव कारला एसटीने जोरदार धडक (car was hit hard by ST) दिली. हा अपघात रविवारी सकाळी १०.३० वाजता घडला. यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. या घटनेतील 6 जण जखमी असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

अभियंता राधेश्याम अशोक इंगोले (२६), त्याची आई रजनी अशोक इंगोले (४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (१८), सारिका प्रमोद चौधरी (२८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. साक्षी प्रमोद चौधरी (१९), प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे (४४) हे तिघेही गंभीर जखमी आहे. एसटी बसमध्ये असलेले सचिन शेंद्रे, धनंजय मिटकरी हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.


राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. तर एमएच-२९-बीसी-९१७३ या कारमधून तीन कुटुंबातील सात जण यवतमाळकडे येत होते. कार समोरासमोर एसटी बसवर धडकली. या भीषण अपघातात कार चालवित असलेला अभियंता राधेश्याम इंगोले, त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे व सारिका चौधरी या दोघी दगावल्या. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यात आली. नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणले. तेथून यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. यवतमाळात जखमींवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दोन महिलांना नागपूर रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात परिसरात तीनही परिवारातील सदस्य आपला शोक व्यक्त करीत होते.

तिघांना नागपूरला हलवले


मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी व इंगोले कुटुंब हे 3 डिसेंबर रोजी लग्न सोहळ्यानिमित्त अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे कारने गेले होते. त्यानंतर आज सकाळी अमरावती येथे देवीचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटीने त्याला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराकरिता नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा|Paneer Bhurji & Amritsari Paneer Pakora Recipe|Epi 46