
शिक्षकांच्या समस्या प्रलंबित राहणार नाही.- आ.चरणसिंग ठाकूर
तालुका प्रतिनिधी नरखेड
महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक महासभा पंचायत समिती, नरखेडच्या विद्यमानाने जिल्हा कार्यकारणीची त्रेमासीक सभा व अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या 130 सेवानिवृत्त शिक्षक वृंदाचा सन्मान समारंभ श्री.साई मंदिर नरखेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार चरणसिंग ठाकूर होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज कोरडे नगराध्यक्ष नगर परिषद, नरखेड, प्रमुख अतिथी नरेश अरसडे माजी सभापती, राजेंद्र हरणे, अशोक दगडे जिल्हा अध्यक्ष, विनोद राऊत राज्य प्रतिनिधी, दीपक सावळकर जिल्हा सरचिटणीस, प्रा.रमेश सावरकर हे होते.
यावेळी मंचावर संदीप सरोदे, प्रा.सुधीर बुटे, चंद्रशेखर चिखले, संजय कामडे, सुदर्शन नवघरे, अजय सोमकुवर, सुनील सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————————————-
जिल्हा कार्यकारणीची त्रेमासीक आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हि आमसभा अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आमसभेचे संचालन दीपक सावळकर यांनी केले. या सभेत विविध विषयावर व शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. व काही महत्वपूर्ण ठराव घेऊन नागपूर येथील जिल्हा अधिवेशनाला येण्याचे आह्वान केले. याशिवाय नरखेड तालुका आमसभेची आढावा बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक नरेंद्र गोळे तालुका अध्यक्ष यांनी केले.व आभार जीवन डफरे यांनी केले.
—————————————————-
यावेळी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या 130 सेवानिवृत्त शिक्षक वृंदाचा वं जि प्रसिद्धी प्रमुख प्रा सुधीर बूटे सर यांचा सत्कार आमदार चरणसिंग ठाकूर यांचे हस्ते करण्यात आला. सत्कारप्रसंगी आ.ठाकूर यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी दुर्वास गावंडे,प्रा.सुनिल मोहोड,डी.व्ही.माळोदे शंकर बालपांडे,प्रेमराज राऊत,एस.टी.ढोले,साहेबराव काळबांडे,सुधाकर तिवसकर,गंगाधर चाफले,मनोहर खोडे,सुरेश बेलखेडे,संजय वाळके, मंगला पुसदकर, संजय घारपूरे, धनराज कळंबे, माधुरी खोडे,रमेश बावणे,मुकेश महल्ले, पुरूषोत्तम क्षिरसागर,राजू मनकवडे,देविदास वाडबुध्दे,शशिकला वघाळे, यांनी अथक परीश्रम केले. कार्याक्रमचे संचालन राम धर्मे, नरेंद्र राऊत,यांनी केले.














