
मुंबई- NCP राष्ट्रवादी काँग्रेसच्या SHRAD PAWAR शरद पवार गटातील आणखी एक बडा नेता अजित पवारांच्या तंबूत जाण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या नेत्याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. हा नेता नेमका कोण, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. आता आणखी एक बडा नेता अजित पवारांच्या साथीला येणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. तो नेता जयंत पाटील आहेत का, हे ,स्पष्ट झालेले नाही. या नेत्याने अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. लवकरच त्या नेत्याचे नाव उघड होण्याची शक्यता अजित पवार गोटातून व्यक्त होत आहे. दरम्यान, शरद पवार हे महाविकास आघाडीसोबतच राहतील, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.