नागपूरसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध

0

नागपूर (Nagpur), 28 मार्च : नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, गुरुवारी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 27 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. वैध अर्जांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे 3 उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार 13 व अपक्ष 10 अशा एकूण 26 उमेदवारांचा समावेश आहे.

वैध उमेदवारांमध्ये नितीन गडकरी (भारती जनता पार्टी), योगीराज उर्फ योगेश पतीराम लांजेवार (बहुजन समाज पार्टी), विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), किवीनसुका सुर्यवंशी ( देश जनहित पार्टी), गरुदाद्री आनंद कुमार (अखिल भारतीय परिवार पार्टी), गुणवंत सोमकुवर ( भारतीय जवान किसान पार्टी), टेकराज बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), दीपक मस्के (बहुजन महा पार्टी), नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट), फहीम शमीम खान ( माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी), विजय मानकर (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), विशेष फुटाणे ( बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), श्रीधर साळवे (भीम सेना), सुनील वानखेडे ( राष्ट्र समर्पण पार्टी), सुरज मिश्रा ( कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), ॲड. संतोष लांजेवार (ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॅाक), आदर्श ठाकूर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे ( अपक्ष), धानु वलथरे (अपक्ष), प्रफुल भांगे ( अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), सचिन वाघाडे ( अपक्ष), साहिल तुरकर(अपक्ष), सुशील पाटील (अपक्ष), संतोष चव्हान (अपक्ष) यांचा समावेश आहे. शनिवार 30 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून आगामी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.