आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊद गँगशी संबंध

0

खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप ; महिलेला ठाकरे गटासह राष्ट्रवादीची फूस


मुंबई. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटासाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची (Thackeray group and NCP leaders ) फूस असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केला. सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी (Dawood Gang) संबंधित असल्याचा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे प्रकरण साधसुधे नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची एनआयए (NIA) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी मी जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळेंनी सांगितले.
माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊद गँगबरोबर काम करते. त्यामुळे हे प्रकरण गेभीर आहे. हा आंतरराष्ट्रीय कट आहे. या महिलेचे पाकिस्तानी आणि दाऊद कनेक्शन आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा असेही शेवाळे म्हणाले. या प्रकरकणात राष्ट्रवादी काँग्रेस मला अडकवण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेना सोडल्याचा राग मनात धरुन हे प्रकरण वर आणल्याचे शेवाळे म्हणाले.
संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचा आरोप शेवाळेंनी केली. माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरूंगात गेली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. आरोप करणारी महिला बार डान्सर असल्याचे शेवाळे म्हणाले.
कोरोना काळात केली होती मदत
कोरोनाच्या काळात सदर महिलेला आर्थिक मदत केली होती. दुबईचे माझे मित्र रेहमान यांनी मला याबाबद मदत करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी तिला मदत केली होती. त्यांनतर तिची अपेक्षा वाढत गेली. पैशासाठी त्या महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवळे म्हणाले. पैसे देणे थांबवले त्यावेळी तिने खोटे फोटे देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझे करीअर संपवण्याचा प्रयत्न केला. सदर महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेने फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्या असल्याचेही शेवाळे म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा