राज्यस्तरीय तायक्वांदो कॅडेट स्पर्धेत आस्था नुरेटीची बाजी

0

गोंदिया – सहावी राज्यस्तरीय तायक्वांदो कॅडेट स्पर्धा नुकतीच मुंबई या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत गोंदियाच्या मुलींनी गोल्ड पदक पटकावलं असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आस्था नुरेटी हीने या स्पर्धेमध्ये सतरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर गोंदिया जिल्ह्याला गोल्ड मेडल पटकावून दिल. देवरी सारख्या आदिवासी भागात राहून तिने हे यश संपादन केलं, त्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे. जेव्हा मुंबईवरून तिचं देवरी या ठिकाणी आगमन झालं, त्यावेळी वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करीत मिरवणूक काढत, जोरदार स्वागत करण्यात आलं.