आयुस्पर्श आयुर्वेदिक चिकित्सालय रोगनिदान,सुवर्णप्राशन शिबिर

0

 

(Nagpur) नागपूर -डॉ स्वप्निल प्रकाश भातकुले यांच्या रघुजी नगर छोटा ताजबाग जवळ आयुस्पर्श आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयातर्फे यशस्वी दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रामुख्याने वात विकार, पोटाचे विकार, कंबरदुखी, थायराइड ग्रंथी वृद्धी,स्त्रियांचे विकार यासंबंधीचे रोग निदान व उपचार निःशुल्क करण्यात आले. यासोबतच आलेल्या रुग्णांची हाडाची तपासणी बीएमडी मशीन द्वारा निःशुल्क करण्यात आली. फिजिओथेरपी डॉक्टरांनी यावेळी आवश्यक रुग्णांना मोफत सल्ला दिला.

या रोग निदान शिबिराचा 76 स्त्री-पुरुष नागरिकांनी लाभ घेतला. यासोबतच लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन कॅम्प घेण्यात आला. यावेळी 40 मुलांनी लाभ घेतला. यावेळी डॉ स्वप्निल भातकुले, डॉ अमित बाळबुधे, डॉ प्रियंका कडवे, डॉक्टर पुष्कर बिजवे यांच्यासह फायटो फार्मा चमूचे महत्वाचे योगदान लाभले. रघुजी नगर, ताजबाग परिसरातील नागरिकांनी आयुस्पर्श आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाच्या या शिबिराचा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.