शिवाजी सभागृहात माथाडी कामगार सेनेतर्फे हृदयरोग तपासणी शिबिर

0

 

 (nagpur)नागपूर – माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी व माथाडी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिवाजी सभागृह दत्तात्रय नगर हुडकेश्वर रोड येथे गुरुवारी पार पडले. कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी,काँग्रेसचे नेते गिरीश पांडव प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमेजवार, विजय कडू, डॉ दीपकराव शेंडेकर, विनायकराव वाघ, वामनराव साळवे, किसन गनेरकर, माधुरीताई घोसेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

डॉ कीर्ती सावरकर,प्रीती श्रीवास, अविनाश चरडे, पूनम मांडवगडे यांनी आरोग्य तपासणी केली. शंभरावर नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी ईसीजी, ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर,हार्टरेट,पल्स रेट, बीएम आय आदी तपासण्या नाममात्र 20 रुपये शुल्कात करण्यात आल्या. सर्वश्री विजय कडू, पुरुषोत्तम तातोडे, सुभाष गुजर, विलासराव इटनकर, धनराज आकोटकर, संजय चिंचमलातपुरे, श्याम कामत, भानुदास खेडकर शंकरराव चौधरी, आशा कोमजवार, ममता बावणे, प्रिया यादव, माधुरी घोसेकर,माया वर्मा आदी अनेकांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.