
काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला
(BJP state president Chandrasekhar Bawankule)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवर सडकून टीका
भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखतंय- बावनकुळे
जो न हित के राम का वह न किसी के काम का!, हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं- बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात
जो न हित के राम का वह न किसी के काम का!
काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते.
राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते.. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे.
यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं
जय श्रीराम!