होळीनिमित्त भरणार ‘मुर्खांचा बाजार’, कविसंमेलन

0

 

नागपूर (Nagpur)-विष्णुजी की रसोईतर्फे होळीनिमित्त नागपूरकर रसिकांना हास्याची मेजवानी देणारा ‘मुर्खांचा बाजार’ शुक्रवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भरवला जाणार आहे. विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे होणा-या या कार्यक्रमात मराठी-हिंदी हास्य-व्यंग किस्से कवितांचे रंग उधळले जातील.

या कार्यक्रमाची संकल्‍पना विष्‍णू मनोहर यांची असून निर्मिती प्रफुल्ल मनोहर यांची आहे‌. सुत्रसंचालन विजय जथे करणार आहेत. अनिल मालोकर, अभय पाण्डेय वशिष्ठ हे हिंदी कवी तसेच, राजेश माहोरकर, मिलींद देशपांडे, अनुराधा हवालदार, शीतल सोनवाने व धनश्री पाटील या मराठी कवी-कवयित्रींच्या रंगतदार कविता व किस्से सादर करतील. हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.

होळी पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने विष्णुजी की रसोईच्या हिरवळीवरील आल्हाददायक वातावरणात लज्जतदार थंडाईचा आस्वाद घेण्‍यासाठी रसिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.