राहुल गांधींचे भाषण हास्यजत्रा

0

 

बुथवर भाजप मजबूत, – बावनकुळे

नागपूर-(Nagpur) केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर टीका करून मोठे होता येणार नाही, राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे हास्यजत्रा आहे. भाजप संघटनात्मक ,बूथ पातळीवर मजबूत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकीकडे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा करीत असताना भाजपने या मतदारसंघात आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या मतदारसंघात कोराडी विधानसभा अंतर्गत बूथ संपर्क अभियानावर असताना बावनकुळे बोलत होते. ९७ हजार पेक्षा जास्त बूथवर आमची कार्य योजना सुरु केली आहे. आज मी २८ क्रमांकाच्या बुथची बैठक घेतली. ५१ टक्के मतांची लढाई आम्ही जिंकू, बूथ लावायलाही इथे कॉंग्रेसचा कार्यकर्ता नाही असे सांगितले.

शिवाजी पार्क सभा संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे भाषण हिंदू बांधवांनो असे करायचे. त्यांनी ते भाषण काल बदललं.उद्धव ठाकरे मतांसाठी राहुल गांधींना शरण गेले आहेत. काल ५० टक्के खुर्च्या सोडून लोक निघून गेले. राहुल गांधी यांचे भाषण लोकांना कळलं नाही, राहुल गांधींचे भाषण म्हणजे हास्यजत्रा आहे.कालची सभा ही हास्यजत्रा होती.आम्हाला कोणाला संपवायची गरज नाही, जनता आमच्या सोबत आहे.

शरद पवार (Sharad Pawar)हे कृषी मंत्री होते. त्यांनी कधी हमीभावाचा, पीक विम्याचा विचार केला नाही.तुम्हाला बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही, तुम्ही एका परिवारात, मतदारसंघात अडकले आहात. कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही,मोदींचा फोटो लावून तुमचे १८ खासदार निवडून आले, तुम्हाला १८ खासदार निवडून आणण्याचे चॅलेंज आहे असे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले, यासोबतचअजून नवनीत राणा भाजपात आल्या नाहीत असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.