Home LOCAL NEWS बीआयटी मटेरियल टेस्टिंग लॅबला प्रतिष्ठित NABL मानांकन

बीआयटी मटेरियल टेस्टिंग लॅबला प्रतिष्ठित NABL मानांकन

0

 

बल्लारपूर (Ballarpur) दि. १३ फेब्रुवारी २०२६ :- बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) यांच्या मटेरियल टेस्टिंग लॅबने आज प्रतिष्ठित नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) चे मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या निमित्ताने लॅबमध्ये भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले असून NABL मानांकनाअंतर्गत कामकाजास औपचारिक सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. गणेश महल्ले यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिल्याने झाली. कार्यक्रमाच्या मंगलमय प्रारंभासाठी प्राचार्य डॉ. रजनीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

 

समारंभाचा मुख्य आकर्षण म्हणजे कार्याध्यक्ष श्री. संजय वसाडे यांच्या हस्ते करण्यात आलेले रिबन कटींग होय. यावेळी पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री. श्रीकांत गोजे तसेच संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता (डीन, R&D) डॉ. ए. झेड. खान , स्टुडंट्स डेव्हलोपमेंट विभाग डीन डॉ अर्चना निमकर ,टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेला संबोधित करताना श्री. संजय वसाडे यांनी संपूर्ण टीमचे कठोर परिश्रम व समर्पणाबद्दल अभिनंदन केले. हे उच्चस्तरीय मानांकन संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना उद्योगमानक चाचणी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. झेड. खान यांनी या यशाच्या व्यापक परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २१ जानेवारी २०२६ रोजी NABL कडून अधिकृतपणे प्रदान करण्यात आलेले हे मानांकन महाविद्यालयाला दर्जेदार आणि प्रमाणित सल्लागार सेवा देण्यासाठी सक्षम ठरेल. यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगांच्या गरजांमधील दरी कमी होण्यास मदत होईल.

मटेरियल टेस्टिंग लॅबचे प्रमुख श्री. नीरज बैस यांनी मानांकन प्रक्रियेदरम्यान सातत्यपूर्ण पाठबळ दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप श्री. सिद्धेश नागापूरे यांनी आभार प्रदर्शन करून केला.

या मानांकनामुळे बीआयटी मटेरियल टेस्टिंग लॅब ही दर्जेदार चाचण्यांसाठी मान्यताप्राप्त केंद्र म्हणून स्थापित झाली असून, नागरी अभियांत्रिकी सल्लागार सेवा आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.