भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक;

0

एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी

अमरावती (Amaravti): पुलवामा घटनेत राज्यपाल (Satyapal Malik)सत्यपाल मलिक यांनी गंभीर वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज (Congress)काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “शर्म करो नरेंद्र मोदी” (Narendra Modi )आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून (BJP)भाजप युवा मोर्चाने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.

त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक हे सर्व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तासापासून तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.दोनही पक्षाचे कार्यकर्ते समोर आल्याने एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.