चौघांचा मृत्यू : भरधाव कार झाडावर घडकली
चंद्रपूर(Chandrapur ) : आयुर्वेदिक उपचारासाठी मध्यप्रदेशकडे (madhya pradesh ) निघालेल्या ब्रह्मपुरी (Brahmapuri ) येथील बडोले कुटुंबावर काळाने घात केला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. यात कुटुंबातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालाचात उपचारादरम्यान मृत्यू (Four people of the same family died in a car accident ) झाला. तिघे गंभीर जखमी आहेत. मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे भीषण अपघात घडला. विजय गणपत बडोले (५८), पत्नी कुंदा बडोले (५२) मुलगा गिरीश बडोले (३२) व विवाहित मुलगी मोनाली चौधरी अशी मृतांची नावे आहेत. तर विजय यांची सून बबिता बडोले आणि दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती येऊन धडकताच ब्रह्मपुरीत शोककळा पसरली.
एसटीचे निवृत्त बसचालक असणारे विजय गणपत बडोले ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीत वास्तव्यास होते. रविवार रविवारी १६ एप्रिलला स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेहीकडे जाण्यासाठी निघाले. विजय स्वतः वाहन चालवित होते. तर, वाहनात एकूण सात जण होते. किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की, कुंदा, गिरीश, मोनाली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहनचालक विजय बडोले, सून बबिता आणि दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शवविच्छेदन करून तीन मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले. रविवारी रात्री ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, विजय बडोले यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खचाखच भरलेली एसटी बस ते सुरक्षितपणे चालवून प्रवाशांना त्यांच्या डेस्टीनेशनवर पोहोचवून द्यायचे, आजीवन त्यांनी हे व्रत पार पाडले. पण, अती वेगाने त्यांचा घात केला आणि एकाचवेळी कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला.