विक्रमशिला नगरात आढळला मसन्याउद ,

0

घेतले ताब्यात

वर्धा (Wardha ): जंगलात तसेच गाव शिवारात राहणारा मसण्या उद हा प्राणी वर्ध्याच्या विक्रमशीला नगर परिसरात आढळून आला. लांब आणि काळ्या रंगाचा असलेला हा मसण्या उद (Masnyaud) चक्क अगदी कुलरच्या आडोश्याला येऊन लपला. पाण्याच्या आणि गारव्याच्या शोधात हा प्राणी विक्रमशीला नगर येथील एका घराच्या अंगणात शिरला. याठिकाणी असलेल्या कुलर आणि भिंतीच्या मध्येच त्याने आडोसा घेतला. पीपल फॉर ऍनिमलच्या (People for Animal ) प्रणिमित्राने रेस्क्यू करीत या प्राण्याला पकडले आणि पिंजऱ्यात बंद करण्यात आले.

सर्वत्र उकाड्याचे दिवस सुरू झाले असताना आता प्राणी देखील थंडाव्याचा आसरा घेऊ लागले आहे. पाण्याच्या शोधात देखील प्राणी घराशेजारी येत असल्याचेच चित्र आहे.