अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून जातील असं मला अजिबात वाटत नाही – खा संजय राऊत

0

मुंबई (Mumbai): विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले होते, काल अजित पवारांचा आमच्या सोबत चांगला संवाद होता अजित पवार हे आमच्याच सोबत विमानामध्ये होते आणि मला अजिबात वाटत नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)सोडून वेगळ्या दिशेने जातील असा विश्वास शिवसेना नेते खा संजय राऊत (Sanjay Raut )यांनी बोलून दाखविला.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आला. आप्पासाहेब यांचे लाखो श्रीसेवक असल्याने ते खारघरला जमणारच होते आणि त्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती ती फक्त व्हीआयपीसाठी केली गेली. भर दुपारी हा कार्यक्रम झाला .गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली खरेतर हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी हा कार्यक्रम करण्यात आला सगळे व्हीआयपी सुरक्षितआणि अप्पासाहेबांचे श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते. आम्हाला या संपूर्ण सोहळ्या वरती अजिबात टीका करायची नाही कारण आम्ही आप्पासाहेबांना मानतो त्यांच्या कार्याला मानतो. तरीही अशा प्रकारे घटना या देशांमध्ये वारंवार होत आहेत त्यातून बोध घ्यायला पाहिजे.

काल रात्री आम्ही नागपूरातून आल्यानंतर रात्री बारा वाजता स्वतः माजी मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे (Adity Thackery),अजित पवार आणि आमचे इतर सहकारी ताबडतोब नवी मुंबईत जाऊन लोकांची विचारपूस केली.
सरकारी कार्यक्रम आहे सरकारने या लोकांना बोलवलं सरकारकडे तज्ञ असतात अनुभवी लोकं असतात त्यांना समजायला हवं होता हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे. कधी संपला पाहिजे कधी सुरू व्हायला पाहिजे किती लांबवांयचा आणि सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान,आज काँग्रेसचे महासचिव के सी वेणू गोपाल संध्याकाळी साडेआठ वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते असतील असेही राऊत म्हणाले.

ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा यांचा दुरुपयोग करून दबाव टाकून शिवसेना तोंडली आली आणि हे सरकार बनवण्यात आलं त्याच पद्धतीचा दबाव पुन्हा सुरू आहे. काही एनसीपी आमदारांवरती कारवाई सुरू आहे धाडी घालून त्यांच्या कुटुंबांना धमकावणे त्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत सुरू आहे तुम्ही एनसीपी सोडा आणि भाजपाला पाठिंबा द्या असा आग्रह धरला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.