पाणी टंचाईच्या विरोधात मनसेचे वाडी नगरपरिषद कार्यालयात आंदोलन

0

नागपूर : नागपुर(Nagpur ) जिल्ह्यातील वाडी (Wadi)शहरात शासकीय रुग्णालय बांधण्याची मागणी,शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा,वाडी क्षेत्रातील होणाऱ्या पाण्याची टंचाई (Water Scarcity) विरोधात नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊनही कुठलीच कार्यवाही न करता नगर परिषदेचे मुख्याधिकारी देशमुख मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप करीत मनसेकडून  (MNS) आज नगर परिषद कार्यालयात आंदोलन करण्यात आले. अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत असल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी कार्यालयात तोडफोड केली.

यावेळी कार्यकर्तेही कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड देखील केली. सामान्य माणसाच्या समस्या सुटणार नसतील तर कार्यालय आणि खुर्च्यांची गरज नसल्याचं मन सैनिकांनी सांगितलं. प्रशासनानं दिलेल्या तक्रारी नंतर आंदोलनकर्त्या मनसैनिकांविरूध्द वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.