भाजपच्या किचन किट वाटपात चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू

0

भाजपच्या किचन किट वाटपात चेंगराचेंगरी ,एका महिलेचा मृत्यू

 

नागपूर – सुरेश भट सभागृहात भाजपच्या घरेलू कामगार कुटुंबातील महिलांना किचन किट वाटप कार्यक्रमात दुर्दैवी घटना घडली.सकाळपासून रांगेत असलेल्या महिलेचा दार उघडताच झालेल्या धावपळीत मृत्यू झाला. मनू तुळशीराम राजपूत (वय 65) रा. आशीर्वाद नगर असे या मृतक महिलेचे नाव आहे. आयोजक,व्यवस्थापक यांच्या नियोजनशून्यपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीतर्फे मनीषा पापडकर यांनी केला. सुरेश भट सभागृह येथे भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे बांधकाम कामगार व घरेलू कामगारांची नोंदणी व कीट वाटप शिबिर 8 ते 10 मार्च दरम्यान राबवण्यात येत आहे.अनेक महिला सकाळी ५ वाजतापासून रांगेत उभे होत्या अशी माहिती आहे. आज शनिवारी सकाळी ७ वाजतापासून खूप मोठ्या प्रमाणात महिला सुरेश भट सभागृह येथे आल्या होत्या. सकाळी गेट न उघडता १०.३० वाजता गेट उघडताच महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या व चेगराचेंगरीमध्ये एक महिला मृत पावली. घटनेची जबाबदारी कंत्राटदारांची होती. दोन दिवसापासून हजारोच्या संकेत महिला या ठिकाणी येत आहेत. व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी समय सुचकता दाखवून संबंधित भाजप पदाधिकारी यांना ,लगेच कळवायला हवे होते परंतु ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अत्यंत दुर्देवी घटना घडली. सुरेश भट सभागृह येथील व्यवस्थापक आणि कंत्राटदार यांच्यावर कलम ३०२ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा जेणेकरून भविष्यात अशा चुका होणार नाहीत अशी मागणी यानिमित्ताने मनीषा पापडकर जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी या घटनेनंतर केली.