मुंबई-MUMBAI शिंदे EKNATH SHINDE व फडणवीस devendra fadnavis सरकार सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी होत असताना शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरु (BJP Central Leadership Upset with five ministers of Shinde Group) आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांचा त्यात समावेश असून या मंत्र्यांची कार्यशैली यामागील कारण असल्याचीही चर्चा सुरु आहे.
भाजपने याबाबत सावध भूमिका घेतलेली असताना विरोधकांनी नेमका हाच मुद्दा सध्या उचलून धरला आहे. भाजप व शिंदे गटातील नेत्यांमध्ये वादाचे काही प्रसंग अलिकडच्या काळात दिसून आले आहेत. त्यातून भाजप शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अशातच असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचे दावे केले जात असून भाजपने ते फेटाळून लावले आहेत. अलिकडेच शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत अमित शहांनी पाच मंत्र्यांच्या कार्यशैलीबद्धल शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरु आहे.