(Nagpur)नागपूर : लोकांचा भ्रमनिरास झाला असल्याने आता भाजपने कितीही आटापिटा केला तरी पराभवाची धूळ त्यांना चाखावी लागणार आहे.मंत्र्यांना प्रचारासाठी गल्ली गल्लीत जाऊन फिरावं लागत आहे. भाजपने अन्यायकारक निर्णय घेतले, आता कितीही अध्यादेश बदलले त्याचा फायदा होणार नाही. जे कर्नाटकात झाल ते भविष्यात राजस्थान, महाराष्ट्रात होणार आहे असा दावा शिवसेनेचे नेते खासदार (Vinayak Raut)विनायक राऊत यांनी आज नागपुरात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, माजी आमदार आणि (Congress MP Balu Dhanorkar) कॉंग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांचे राजकीय गुरू मानले जाणारे खासदार विनायक राऊत आज धानोरकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आले होते. राऊत म्हणाले, मागील 30 वर्षापासून धानोरकर यांचे आमच्याशी निकटचे नाते आहे. अल्प आजाराने त्यांचे निधन झाले हे न पचणारे दुःख आहे. परमेश्वराने पिता-पुत्राच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंबियांना या संकटातून बाहेर पडण्याची ताकद द्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आगामी निवडणूक संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची एकच बैठक झाली आहे. आमच्या जेवढ्या जागा जिंकून आल्यात त्या ठिकाणी पर्यायी उमेदवार तयार आहे. जेवढ्या जागा आहे तेवढ्या राहिल्याच पहिजे,शिल्लक जागेवर चर्चा होईल अशी भूमिका आहे. तूर्तास तिन्ही पक्षात 16 /16 चा प्रस्ताव चर्चेला आलाच नाही पुढील चर्चा जुलै महिन्यात होणार आहे. आज शिवसेनेचे 19 खासदार आहेत पण आमचा उमेदवार कमजोर असेल आणि महाविकास आघाडीचा ताकदवार उमेदवार असल्यास निश्चितच सकारात्मक चर्चा करू असा (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा दाखवला आहे असे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सामंजस्याने एकत्रित उभे राहणार आणि लढणार. भाजपच्या अधोगतीची सुरुवात झाली असल्याचे तावडे यांच्या सर्वेत दिसून आलेच आहे.
आज सहकार क्षेत्र भष्ट्राचार मुक्त करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग आम्ही पक्षासाठी केला नाही. दुर्दैवाने भाजप छत्रपती महाराजांचेच नाव वापरत आहे. महापुरुषांचे पुतळे दूर करणारे भाजपवाले (BJP ) आहेत, आम्ही कधीच अवहेलना करणार नाही. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही, म्हणून त्यांचामध्ये भ्रमनिरास झाला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्या रूपाने (Shinde Group)शिंदे गटातील भावनांचा स्फोट झाला. येत्या काही दिवसात आणखी स्फोट होतील.अनेक जण आमच्या संपर्कात आहेत असा दावा केला.