इतवारी-टाटा पॅसेंजर रुळावरून घसरली…आणि उडाली धावपळ !

0

(Nagpur) नागपूर – इतवारी रेल्वे स्टेशवर ( Itwari Railway Station)आज टाटा इतवारी पॅसेंजर दुर्घटनाग्रस्त झाली. एक डबा रुळावरून घसरला तर दुसऱ्या डब्यात आग लागल्याने 30 प्रवासी जखमी झालेत या घटनेत तिघांचा मृत्यू झाला 12 जणांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर उर्वरित 18 जणांना उपचारांनंतर घरी रवाना करण्यात आले.

मात्र, काही वेळातच हा सर्व अपघातात घ्यावयाची खबरदारी या दृष्टीने सरावाचा भाग असल्याचे पुढे आले आणू इतवारी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी आणि सारेच रिलॅक्स झाले. सर्वकाही सुरळीत पार पडल्यानंतर प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला. वाढते अपघात आणि संभाव्य घटना लक्षात घेता रेल्वे प्रशासन, आरपीएफ, एनडीआरएफ, अग्निशमन यंत्रणा, स्काऊट गाईड्स आदींच्या मदतीने हा संयुक्त सराव आज करण्यात आल्याची माहिती ( South East Central Railway Divisional Manager Namitha Tripathi)दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी दिली.