भाजपाचे जिल्हयात बूथ सक्षमीकरण अभियान जोरात!

0

 

नागपूर -भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने बूथ सक्षमीकरण अभियान जिल्ह्यातील 116 पंचायत समिती व 20 नगरपंचायत नगरपरिषद सहित 156 ठिकाणी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात राबविले जाणार आहे. याचा प्रारंभ कामठी विधानसभेतील अरोली, कोदामेंढी, खात,धानला, चिरव्हा, तारसा, माथनी या पंचायत समिती सर्कल, मौदा नगरपंचायत क्षेत्र तसेच सावनेर विधानसभेतील केळवद, नांदा गोमूख, वाकोडी,खुबाळा,वाघोडा, बडेगाव या पंचायत समिती क्षेत्रात व खापा नगरपंचायत क्षेत्रात दौरा करून नुकताच झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती क्षेत्रातील बूथ समिती सक्षम करून येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गावागावातील कार्यकर्ते या अभियानाशी जोडले जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 2376 बूथवर बूथ समिती, मतदार यादीतील प्रमुख तसेच नागरिकांनाही समाविष्ट केले जाणार आहे. जिल्ह्यातील एक लाखाच्यावर पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात भाग घेणार आहेत.या अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे संघटन मजबूतीचा प्रयत्न होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील भाजपाची संपूर्ण टीम कामाला लागली आहे. या अभियानाकरिता जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी कामठी विधानसभेकरिता आमदार टेकचंद सावरकर,हिंगना विधानसभेकरिता आमदार समीर मेघे, उमरेड विधानसभेकरिता माजी आमदार सुधीर पारवे, रामटेक विधानसभेकरिता माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सावनेर विधानसभेकरिता भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजीव पोतदार, काटोल विधानसभेकरिता भाजपा नेते चरणसिंग ठाकूर यांना अभियानाची जबाबदारी दिली आहे.नागपूर जिल्ह्याचे संघटन महामंत्री किशोर रेवतकर या अभियानाचे संयोजक असून सहसंयोजक व नागपूर जिल्हा महामंत्री अजय बोढारे दौरा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.