अयोध्येतील श्रीराम पादुका नागपुरात,दर्शनासाठी गर्दी

0

नागपूर : अयोध्या येथून आलेल्या चांदीच्या रत्नजडित श्रीराम पादुकाच्या दर्शनासाठी बैद्यनाथ चौकातील टाटा कॅपिटल हाईट्स परिसरात आज सोमवारी रात्री भाविकांची गर्दी उसळली. प्रभू श्रीराम वनवासात असताना ज्या भागातून गेले त्या ठिकाणी या पादुका फिरत आहेत.देशभ्रमण केल्यानंतर या पादुका परत अयोध्येला परत जाणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. इस्कॉनच्या माध्यमातून हा सुवर्णयोग जुळून आल्याची माहिती यानिमित्ताने देण्यात आली. पादुकांची आकर्षकरित्या सजविलेल्या बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली.
रामजी की निकली सवारी…गीतसंगीतावर स्त्री-पुरुष आनंद साजरा करीत होते. या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या श्री हनुमान मंदिर परिसरात या चरण पादुकांचा दर्शन सोहळा झाल्यानंतर त्या पादुका हैदराबादकडे निघाल्याची माहिती रमेश जेजानी यांनी दिली.