Home NAGPUR NEWS भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

0

नागपूर- नागपुरात वाठोडा पोलिस हद्दी बिडगाव परिसरात भीषण अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव टिप्परची बहीण-भावाला धडक दिल्याने दोघेही घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवून देत वाहनाची तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातात सुमित नंदलाल सैनी (वय १८ दुर्गानगर) आणि अंजली सैनी (वय १६) हे भाऊ-बहीण मृत्यूमुखी पडले असून ते दुर्गानगर येथील रहिवासी होते, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातात दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी या टिप्परला आग लावली. अग्निशामक दलाच्या वाहनाकडून या टिप्परवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली