सुनील केदारांचा थर्टी फर्स्ट कुठे?

0

नागपूर (nagpur) – काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार (sunil kedar) यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सर्व अहवाल व्यवस्थित येताच त्यांना डॉक्टरांनी सुटी दिली व त्यांची पोलीस वाहनातून कारागृहात रवानगी करण्यात आली.30 डिसेंबर रोजी त्यांच्या जामीन व शिक्षा स्थगिती संदर्भात न्यायालय निर्णय देणार असल्याने केदार यांचा मुक्काम कारागृहात किती दिवस राहणार हे लवकरच उघड होणार आहे.

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर निर्णय होणार 30 रोजी

काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून शिक्षेला स्थगिती व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आल्यावर आज काय होणार याविषयी उत्सुकता होती. मात्र निर्णय आता 30 डिसेंबरपर्यँत पुढे गेला आहे. शिक्षेला स्थगिती संदर्भात दोन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरही निर्णय शनिवरपर्यंत पुढे गेला आहे. यामुळे जेएमएफसी कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर जिल्हा सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती, जामीन देणार का, केदार यांना आमदारकी बहाल होणार का याविषयी टांगती तलवार कायम आहे. 152 कोटींच्या रोखे घोटाळा प्रकरणी शिक्षेनंतर विलंब झाल्यामुळे त्यादिवशी अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्यात. त्यामुळे मंगळवार २६ डिसेंबरला सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एस. भोसले (पाटील) यांच्या न्यायालयापुढे केदार यांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली.आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने 5 वर्षे शिक्षा सुनावलेले सुनील केदार यांच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचे कळते.