पाल हॉटेलला आग; 6 जणांचा मृत्यू

0

पाटणा (patana) जंक्शनपासून 50 मीटर अंतरावर असलेल्या पाल हॉटेलला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीने आजूबाजूच्या तीन हॉटेलदेखील जळून खाक झाल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुष आहेत. शहराचे एसपी सेंट्रल सत्यप्रकाश यांनी सांगितले की, जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 20 लोक सध्या PMCH मध्ये उपचार घेत आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. (Patna Hotel Fire)

Cylinder Blast आगीमुळे 45 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 51 गाड्यांच्या पाण्याचा वापर करण्यात आला. आग विझवल्यानंतर बचाव पथक हॉटेलच्या आत गेले, जिथे मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आग लागताच हॉटेलमध्ये Hotel Fire ठेवलेले सिलिंडर ब्लास्ट होऊ लागले. 6 हून अधिक सिलिंडरचा स्फोट झाला. स्टेशनकडे जाणारा रस्ता सुमारे तीन तास बंद होता. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत 4 मजली होती. आग सर्व मजल्यांवर पसरली होती. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हायड्राचाही वापर करण्यात आला. आगीमुळे हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सिलिंडरचाही स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत हॉटेलशेजारील इमारतही जळून खाक झाली.