Home Top News ठाकरे गटाकडून या २३ जागांवर दावा

ठाकरे गटाकडून या २३ जागांवर दावा

0

मुंबई : महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झाले नसले तरी शिवसेना ठाकर गटाने आपल्या २३ जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर समझोता होणार नाही, असी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाणार असल्याचे समजते. (Lok Sabha Election) शिवसेनेने दावा केलेल्या जागांमध्ये रामटेक, बुलडाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण-मध्य, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला या जागांचा समावेश आहे.
शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २३ जागा लढण्यावर ठाम आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेचा पहिल्या फॉर्म्युल्याची चर्चा देखील सुरु आहे. शिवसेना २३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५ आणि काँग्रेस १० असा हा फॉर्म्युला आहे. मात्र, या फॉर्म्यूल्याची चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या वचिंत आघाडीनेही एक फॉर्म्युला महाविकास आघाडीला दिला आहे. त्यात वंचित आघाडीने १२-१२-१२-१२ असा फॉर्मुला महाविकास आघाडीला दिला आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि वंचित या सर्वांनी प्रत्येकी १२ जागा लढवाव्या, असे प्रकाश आंबेडकरांना वाटते.
दरम्यान, शिवसेनेच्या फॉर्म्युल्यात शिवसेनेने शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी (अमोल कोल्हे) सोडण्याचा व ईशान्य मुंबईच्या जागेसाठी आग्रह धरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अकोल्याचीची जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याची तयारी शिवसेनाने केली आहे. शिवसेना आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोला जागा वंचितला देण्याची तयारीत आहे.