भुजबळांची नाराजी काढणार हे ‘तीन’ नेते

0

कोल्हापूर KOLHAPUR -मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झालेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री, मी आणि देवेंद्र फडणवीस असे तिघेही  CHAGAN BHUJBAL  भुजबळांशी बोलू, असे अजित पवार म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी ‘वाचाळवीर’ लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असा पलटवार केला.

अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाणार, हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणबाबत काही जणांना हे थांबावे, असे वाटत नसावे. म्हणून जण काही जण बोलत असतील त्यांना वेदना होत असतील, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. काल प्रफुल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही. विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरे काही काम राहिले नाही, असेही ते म्हणाले.