आठवडाभरात ‘सीएए’ लागू होणार..? केंद्रीय मंत्र्याचा दावा

0

कोलकाता-नागरिकत्व सुधारणा कायदा Citizenship Amendment Act येत्या ७ दिवसांत देशभरात लागू केला जाणार असल्याच दावा केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर Minister Shantanu Thakur  यांनी रविवारी केलाय.

२४ परगणा येथील काकद्वीप येथे एका सभेला संबोधित करताना ठाकूर यांनी हा दावा केला असून CAA सीएए केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर येत्या ७ दिवसांत देशभर लागू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकूर यांच्या दाव्यावर तृणमूल काँग्रेसने राज्यात कोणत्याही परिस्थितीत सीएए लागू केला जाणार नाही, असे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकार अशा बातम्या पसरवत असल्याचा आरोप तृणमूलचे प्रदेश प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला. दरम्यान, सीएएची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील केले आहे. २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधयेक २०१९ पारित करम्यात आले आहे. यामध्ये 1955च्या कायद्यात काही बदल करावे लागले. हे बदल भारताच्या तीन मुस्लिम शेजारी देश बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी होते.