50 शेतकरी उपोषणाला का बसलेत?

0

 

गोंदिया GONDIYA – गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव Arjuni Morgaon  तालुका हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागामध्ये धान पिकासोबतच इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या भागात सध्या रब्बी पिकाचा हंगाम सुरू आहे आणि शेताला पाणी आवश्यक आहे. मात्र, महावितरण विभागाद्वारा फक्त आठ तास विद्युत पुरवठा केला जातो आणि तोही रात्रीच्या वेळी केला जातो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. यापूर्वीही शासनाला निवेदन देऊन त्यांनी सांगितलं की, आम्हाला बारा तास पुरवठा करावा.

परंतु शासनाने याबाबतीत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने आज अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत 50 शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

रब्बी पिकाच्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अकरा वाजता विद्युत पुरवठा हा शेतीच्या पाण्यासाठी सुरू करण्यात येतो.

त्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जातात आणि आपला विद्युत पुरवठा सुरू करतात. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर जंगली प्राणी, साप, विंचू यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यामुळे 6 शेतकऱ्यांचा यापूर्वी जीव गेलेला आहे. जोपर्यंत आम्हाला बारा तास दिवसा विद्युत पुरवठा सुरू होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.