खासदार बाळू धानोरकर यांनी वेधले लक्ष : ताडाळी स्टील प्लांटच्या विस्ताराला परवानगी नको
चंद्रपूर. जिल्ह्यातील (Chandrapur district ) औष्णिक ऊर्जा प्रकल्प, कोळसा खाणींमुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर (The problem of pollution has become serious due to thermal power plants, coal mines ) झाला आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग वाढत असल्याने प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस अधिकत तीव्र होते आहे. चंद्रपूर शहर हे राज्यात प्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नोंद आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar ) यांनी लोकसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. वाढते प्रदूषण आणि चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा विचार करीत ताडाळी येथील स्टील प्लांटच्या विस्तारीकरणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत बोलताना केली. वाढते प्रदूषण हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठीच चिंतेची बाब ठरली आहे. पर्यावरण विषयक संस्था, संघटनांनी या प्रश्नावरून वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. सोबतच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही केली. मात्र, त्याकुडे फारसे लक्षच दिले जात नसल्याचे चित्र आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत हा विषय मांडला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5500 मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यासोबतच सहा सिमेंट प्लांट, दहा स्टील प्लांट, बल्लारपूर पेपर मिल, याशिवाय 48 कोळसा खाणी आहेत. चंद्रपूर शहराजवळील महाऔष्णिक विद्युत केंद्रातून 2920 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. यातील युनिट नंबर तीन आणि चार 1985 पासून प्रती 210 वीज निर्मिती होते. त्याला ३७ वर्षे झाली असून, कोळशावर वीज निर्मिती करणाऱ्या युनिटची क्षमता २५ वर्षांची असते. असे असतानाही मागील १०-१२ वर्षापासून मर्यादेपेक्षा अधिक काळ वीज निर्मिती केली जात असल्याने प्रदूषण वाढले आहे. हा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. महाराष्ट्र सरकारने ज्याची मर्यादा 2030 वर्षापर्यंत का वाढविली, असा प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांनी मांडला. चंद्रपूर जिल्हा आधीच प्रदूषणाच्या गरजेच सापडलेला असताना एमआयडीसी ताडाली येथे ग्रेस स्टील प्लांटचा विस्ताराची परवानगी देण्यात येऊ, अशी मागणी देखील खासदार बाळू धानोरकर यांनी केली.