
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रविवारी दुपारी ४.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते. सायंकाळी रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी स्वागत केले.यावेळी माजी मंत्री दीपक सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी रामटेक येथील गड मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या नेहरू मैदानावरील शिवसंकल्प अभियान या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.रात्री उशिरा ते मुंबईकडे प्रयाण करतील.