अभ्यास करूनच वेगळी वाट निवडली : भुजबळ

0

मुंबई : आम्ही सत्तासंघर्षाच्या निकालाचा अभ्यास करूनच वेगळी वाट निवडली. त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वास राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. सर्वांचे प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे. नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काही काम करत नाही. सगळा विचार करुन आम्ही हे पाऊल टाकले आहे. सर्वाेच्च न्यायालयाचा काय निकाल आहे, हे सर्व विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पाऊल उचचले आहे. अनेकदा सांगूनही युवक महिलांच्या नियुक्ता करण्यात आल्या नाही, असेही ते म्हणाले. पक्षात सर्व समाजातील घटक आवश्यक असतात. मराठा समाज, ओबीसी, 400 जाती, दलित, आदिवासी, मुस्लिम समाज पक्षासाठी आवश्यक आहेत. सर्व समाजाला सोबत घेऊन आम्ही जात आहोत. अजितदादांच्या बंडांनंतर सुनील तटकरे या ओबीसी समाजाच्या नेत्याकडे पक्षाचे नेतृत्व दिले आहे. शरद पवारांनी हे करावे, यासाठी आमचा आग्रह होता. मात्र, त्यांनी हे केलेच नाही, असेही भुजबळ म्हणाले.