मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील दौड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांना क्लिनचीट दिली आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे.
सरकराने नमूद केले आहे की, २०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नसला तरी २०२१-२२ लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासनही सरकारने दिले आहे .