पैसे वाटपाच्या विरोधात तक्रार 

0

सिंधुदुर्ग(Sindhudurg), 15 मे नुकत्याच झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार नारायण राणे(Narayan Rane) याना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झाले आहे, अशी तक्रार उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दि. ७ मे २०२४ रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे निदर्शनास आले. याविषयीची तक्रार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

या संदर्भातील पुराव्यासाठी फोंडाघाट येथील भाजप कार्यकर्ता विश्वनाथ जाधव हा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ आपल्याला पाठवत आहे. पैसे देताना हे पैसे श्री. नारायण राणे साहेबांनीच दिले आहेत असे मतदाराला सांगण्यात आले आहे. तरी यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी श्री नाईक यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली मतदार संघातील ही पहिली तक्रार असल्याने याकडे आता काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.