
अमरावती- संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी करीत काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. करमचंद गांधी नव्हे तर एक मुस्लिम जमीनदारच मोहनदासचा खरा बाप ! या संभाजी भिंडे यांच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले असून संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावतीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला दरम्यान,संभाजी भिंडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही असा आरोप काँग्रेसचे नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.