conversion ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर, शहानवाज पोलिसांच्या ताब्यात

0

ठाणे THANE : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराच्या conversion  आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी शहानवाजला गाझियाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शहानवाजला (Religious Conversion Case) रविवारी अटक करण्यात आली होती. आज मुंब्रा पोलिसांनी त्याला ठाणे कोर्टात हजर केले आहे. यावेळी गाझियाबाद पोलीसही न्यायालयात हजर होते. गाझीयाबाद पोलिसांना त्याचा ट्रान्झिट रिमांड देण्यात आला. त्याला पुढील तीन दिवसात स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

न्यायालयाने आदेश दिले की, शाहनवाज याला रस्ते मार्गाने गाझियाबाद येथे नेण्यात येत असताना रस्त्यात वेळोवेळी ब्रेक घेऊन त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. त्याला सुरक्षित नेण्यात यावे. तीन दिवसात गाझीयाबादला पोचल्यावर तेथील न्यायालयात त्याला हजर करण्यात यावे. गाझीयाबाद पोलिसांनी मोबाईल गेमच्या (Mobile Game) नावाखील धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवले जाते. मग त्यात फसवले जाते आणि पुढे त्यांना धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केले जाते. ही मुले ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गाझियाबादमधल्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे आणि गाझियाबाद पोलिसांनी एकत्र कारवाई करत त्याला अलिबागमधून अटक केली. तो त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता.