नागपूर NAGPUR : पाणी टंचाई नसल्याने बरेच शेतकरी पूर्व हंगामी कापूस लागवड करीत असतात. त्यानंतर कोरडवाहू कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्यावर हंगामातील कापसाला भाव मिळाला नसल्याने अनेक ठिकाणी 50% शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडलेला आहे. परंतु अनियमित पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी इतर पिक घेत नाही. कापूस आणि मकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यावर्षी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे लागवड करताना शेतकरी दिसत आहे.