किसान मोर्चाच्या समर्थनार्थ निदर्शने

0

 

अमरावती (Amravti) – राष्ट्रव्यापी किसान महापंचायतच्या समर्थनार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आले. देशभरातील शेतकरी-शेतमजूर संघटनांची निदर्शने नवी दिल्ली येथे सुरू आहे. त्याचे आयोजन संयुक्त किसान मोर्चा, नवी दिल्ली यांनी केले आहे. त्यामध्ये किसान-मजूर कामगारांचे प्रश्न व प्रस्ताव मांडून पुढील संघर्षाची वाटचाल निश्चित होईल. किमान आधार भावाचा (MSP) कायदा बनवा, सर्वकष पीक विमा योजना सुरू करा, किसान-मजूर असंघटीत कामगारांकरीता पेंशनचा केंद्रीय कायदा करा, विज बिल कायदा 2022 मागे घ्या, विशेष भूसंपादन कायदा 2013 ‘जैसे थे’ पुनर्स्थापित करा, या मागणीसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.