खासदार राहूल गांधीचा जनतेशी संवाद

0

नाशिक (Nashik)- कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरवात झाली आहे. भाजपाचे लोक द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. मणीपुरपासून दुसऱ्या टप्प्याची यात्रा सुरू झाली, आज मोदी सरकारमार्फत कष्टकरी,शेतकरी यांच्याविरोधात निर्णय घेतले जात आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये जनतेशी संवाद साधत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ते 25 लोकांचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले.यात अदानीसारख्या बड्या लोकांचे कर्ज माफ केले, सरकारने शेतकरी,कामगार यांचे कर्फ माफ केलेले नाही.अशा सर्व गोष्टींच्या विरोधातच आम्ही ही यात्रा काढली असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.