जिल्ह्यात केवळ 54 टक्के पाणीसाठा

0

 

गोंदिया (Gondia) – गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धरण साठ्यामध्ये 54 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या तरी गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचली नसली तरी मात्र पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने पूजारीटोला, शिरपूर, कालीसरार, इटीयाडोह चारही धरणांमधील 22 टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले.

उर्वरित पाणी शेतीकरिता वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई नसली तरी भविष्यात मात्र, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचू शकते. यासाठी नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोंदिया यांच्यामार्फत करण्यात आले आहे.