मटण खाऊन देवदर्शन… राज्यात नव्या वादाची चिन्हे

0

शिवतारेंचा गंभीर आरोप : सुप्रिया सुळे म्हणाल्या महागाई, बेरोजगारी मोठे प्रश्न

पुणे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच (political atmosphere in the state is heating up) मटण आल्ल्यानंतर देवदर्शनावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचे झाले असे की, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Shinde group leader Vijay Shivtare ) यांनी राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांच्यावर आधी मटण खाऊन नंतर देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी फेसबूकवर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फोटोसोबत बोलके कॅप्शनही पोस्ट केले आहे. याबाबत पुण्यात सुप्रिया सुळे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता आज देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मोदी सरकार याकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप करीत. हे विषय अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. या आरोप आणि टीकेच्या मालिकेनंतर हा वाद अधिकच पुढे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिवतारे यांनी पोस्ट करताना, आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला, असे कॅप्शन दिले आहे.

या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी याबाबत काहीही बोलू शकत नाही. याबाबत मला काहीही माहिती नाही. आज महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. देशात महागाई आणि बेरोजगारीवर मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून यावर बोलतोय. आज देशातील उत्पादकता कमी झाली आहे. कांद्याच्या नियोजनाचा अभाव आपण गेल्या आठवड्यात बघितला. देशात कांद्याला भाव नसताना, जगात कांद्याला प्रचंड मागणी होती. अशा वेळी सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा होते. मात्र, तसे निर्णय झालेले दिसत नसल्याचे त्या म्हणाल्या.

विरोधकांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षाच्या ज्या भावना आहेत, त्या एका पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पोहोचवल्या असतील तर या परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. पुढच्या आठवड्यात संसदेचे सत्र पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे हे सर्व मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा