शिकारी रोखण्यासाठी वनविभाग अलर्ट मोडवर

0

खबऱ्यांचे नेटवर्क विस्तारण्यावर भर : व्याघ्र प्रकल्पांवर अधिक पाळत

नागपूर. राज्यात वाघाच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे (increase in tiger deaths in the state). शिकारीच्या घटनाही वाढत आहेत. या पार्शभूमीवर वनविभाग अलर्ट मोडवर आले आहे (Forest department on alert mode). दरवर्षीच्या अनुभवानुसार मार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन विशेष खबरदारी बाळगली जात आहे. वनांलगतच्या भागांमध्ये खबऱ्यांचे नेटवर्क विस्तारण्यावर भर दिला गेला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर अधिक पाळत ठेवली जात आहे. शिवाय जंगलांलगतच्या गावांमध्ये अनोळखी किंवा नवखी व्यक्ती दिसल्यास तत्काळ माहिती देण्याची सूचना खबऱ्यांना दिली गेली आहे. उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी वाघ दरदिवशी १५ ते २० किमी अंतरचा प्रवास करतो. नेमकी हीच बाब हेरून तस्कर नैसर्गिक वा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये युरिया अथवा विषप्रयोगाद्वारे वाघांची शिकार करतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यत त्या सर्व उपाययोजनाही केल्या जात आहेत.
वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या शिकारीसाठी तस्करांकडून सतत वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. साधारणपणे व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात स्थानिकांना हाताशी घेऊन वाघांसंदर्भात रेकी केली जाते. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविल्यानंतर वाघांची शिकारी केली जाते. मात्र, वन्यजीव विभागाने यावर्षी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांना लक्ष्य केले आहे. खबऱ्यांची फौज निर्माण केली आहे. वाघांची रेकी वा शिकार करण्याच्या मनसुब्याने आलेली व्यक्ती वनविभागाने जेरबंद केल्यास या मोबदल्यात संबंधित खबऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचे वन्यजीव विभागाचे प्रयोजन आहे.
पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा, मेळघाट, ताडोबा-अंधारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गक वा कृत्रिम पाणवठ्यांच्या परिसरात वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाणवठ्यांवर विषप्रयोग किवा युरिया मिश्रित करून वाघांच्या शिकारीचा डाव ट्रॅप कॅमेऱ्यातून उघडकीस आणता येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. यंदा नव्याने २५०० पाणवठे तयार करण्यात आले आहे.