देवेंद्र फडणवीसही रुग्णालयात धनंजय मुंडेंच्या भेटीला

0

मुंबई (mumabi) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे (NCP Leader Dhananjay Munde) रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या अपघातानंतर राज्यातील अनेक सत्ताधारी आणि विरोधक नेत्यानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा यांनीही दवाखान्यात जाऊन आपल्या भावाच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 3 जानेवारीला परळीतील अपघातात मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला होता. अपघातात मुंडेंच्या कारचेही मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्र्यांनीहा काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे या भावाबहीणीमधील राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. सातत्याने या दोन नेत्यांमध्ये धुसफूस सुरु राहते. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करतात. पण, अनेकप्रसंगी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे. यावेळीही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्याशी फडणवीस यांचे आजही सलोख्याचे संबंध आहेत. दोघे सातत्याने एकमेकांना भेटत राहतात. यानिमित्तानेही या दोन नेत्यांमधील सलोख्याचे दर्शन राजकीय वर्तुळाला घडले आहे.